इतिहास / History

History / इतिहास | महाराष्ट्र मंडल कानपुर

सन् 1926 साली मण्डळां ने एक ग्रंथ संग्रहालय सुरु केले त्यात सुमारे २०० चे वर पुस्तके जमा केली होती. पुढे काही काळ ह्या विभागा चे कार्य शिथिल पडले व जवळ – जवळ विसर पडला. वर्ष 1977-78 साली श्री गणेश करकरे यांना ग्रंथालय मंत्री नेमण्यात आले, तेव्हा पुनः नव्यानी ग्रंथालय / वाचनालय चे कार्य प्रारंभ झाले.

 

1964 – 65 च्या सुमारांस कै० आचार्य कृ० वि० फडके यांचा सत्कार मण्डळां ने केला व अर्थ – सहाय्य म्हणून काही रकम भेंटकेली. आचार्य नि त्या रकमें तून प्रत्येकी 25/- ची पुस्तके शहरांत विभिन्न भागांत भेंट देऊन विध्यार्थी मुलास बाळ – वाचनालय सुरु करण्यास आग्रह केला त्या विभागापैकी एक विभाग अनवरगंज मराठी समाज पण होते . तिथे बाळ – वाचनालय नियमित चालले. श्री रामचंद्र घाणेकर, प्रकाश बस्वापट्टणकर, श्रीनिवास पटवर्धन बरोबर श्री गणेश करकरे हे कार्य करीत होते पुढे शिक्षण पूर्ण करून ही (मण्डली) नौकरी व्यवसाय की पायी बाहेर गेली व वाचनालय चे कार्य शिथिल झाले.

 

महाराष्ट्र मण्डळ कानपुर व अनवरगंज वाचनालयां ची ग्रंथ संपदा घेवुन महाराष्ट्र मण्डळ ग्रंथालय / वाचनालयां ची पुन: सुरुवात 1978 साली ‘ टिळक – जयंती’ 23 जुलै च्या शुभ मुहूर्ता वर करण्यात आली तेव्हा श्री गो० प० पटवर्धन अध्यक्ष व श्री म० ना० सराफ चिटणिस होते.

 

श्री गोपाळ राव पटवर्धन च्या सहकार्य नि महाराष्ट्र मण्डळ कलकत्ता दरवर्षी 500/- ते 700/- ची पुस्तके ग्रंथालयाला भटेकरीत असे. 1980-81 साली ग्रंथालयानी घर – पोंच सेवा करून सभासदां ची सोय केली व वाचकांची संख्या 125 च्या वर झाली. 1984 च्या सुमारांस श्री करकरे यांनी मण्डळ – कार्यकारिणी चे पद सोडले त्यावेळेस ग्रंथसंग्रह सुमारे 1200 चा झाला होता, नंतर श्री अशोक कुंटे यांनी बरीच (सुमारे 20) वर्ष ग्रंथालय चे कार्य संपादन केले पुढे श्री कुंटे नागपूर ला स्थायीक झाले व संप्रती श्री अजय तांबे, ग्रंथालय – मंत्री चा कारभार साम्भाळून आहे अगर श्री शशिकांत पाठक यांच्या सहाय्यां ने घरपोच सेवा चालू आहे.

 

महाराष्ट्र मण्डळ नाटय समिती – ह्या समिती चा मुख्य उद्देश्य स्थानीय महाराष्ट्रीयन लोकांना मराठी नाटके करून नाटचकलेशी संबंध ठेवणे व करमणूकी द्वारे होणार्या उत्पन्नातून मंडल चा काही खर्च श्री गणेशोत्सवांत ही अर्थ सहाय्य आदि ची मदद करण्यासाठी विनियोग करणे होता. पुढे नाटक – विभाग महाराष्ट्र मण्डळा चा कार्याचा भाग झाला व कार्यकारिणी नाटय – मंत्री ना हा कार्यभार देण्यात आला, ही व्यवस्था आजतागत चालू आहे.

 

दरवर्षी गणेशोत्सवांत एक किंवा एकाधिक नाटकांचा प्रयोग होतो . स्थानीय मण्डळी द्वारा बाल – नाटके, महिला – पात्री नाटके व महिला पुरुष पात्री नाटके साजरी करण्यात येतात . बाहेरगांवी (मुंबई, नागपूर, इंदौर, ग्वालियर, झांसी प्रामुख्याने) नाटकांची देवाण – घेवाण होतं असते. फार पूर्वी झालेल्या नाटक ची नोंद उपलब्ध नसली तरी 1960 पासून 2017 पर्यंत 100 च्या वर नाटकांचे प्रयोग संपन्न झाले आहेत बृ. म. मण्डळां च्या रंगायन नाटय – प्रतियोगीतेत ही महारष्ट्र – मण्डळ, कानपुर प्रामुख्याने भाग घेत असे. पैकी “सूर्या ची पिल्ले – 1980” जोडीदार – 1993 कार्य काळजात घुसली – 1992 आदि नाटकांना श्रेष्ठ नाटक, सर्वोत्कृष्ट – नायक, नायिका, बाल- नट, संगीत, दिग्दर्शक आदि चे पुरस्कार पण मिळाले आहेत.

 

मण्डळांत मराठी नाटकें शिवाय गणेशोत्सव. इतर वेळा हिंदी नाटकां चे प्रयोग पण होतात वर्ष 2012 पासून मण्डळा चे भव्य – प्रेक्षागृह झाले असून नाटकांचे प्रयोग इथेच होतात व प्रेक्षक क्षमता 450 आहे. पूर्वी शहरातिल विभिन्न प्रेक्षगृह – मर्चन्ट चेम्बार, लजपत भवन, एच. बी. टी. आय., मेडिकल कॉलेज, आदि मधून हे प्रयोग होत असत.

कानपुर महाराष्ट्र मंडळाचा संक्षिप्त इतिहास

1916 साली कानपूरात ब्रह्मावर्त किंवा बाहेरून आलेल्या महाराष्ट्रियन मंडळीनां एकत्र जमण्यासाठी एखादे क्लब किंवा संस्था असावी असे वाटले म्हणून जुलै 1916 ला शहरातले बादशाहीनाका ह्या मोहल्ल्यात कै. नानासाहेब गोगटे यांच्या राहते घरी महाराष्ट्रियन सामाजिक मंडळ नावांची संस्था स्थापण्यात आली. प्रत्येक रविवारी एकत्र जमून गप्पा, खेळ, व्याख्याने, चहा-चिवड़ा खाणे, गाणें-वाजविणें वगैरे प्रोग्राम तेथे होत असत. ही संस्था सरासरी तीन-चार वर्षे चांगली चालली पण श्री गोगटे ती जागा सोडून मिल कम्पाउंड मध्ये रहाण्यास गेल्यावर जागे ची अडचण पडू लागली व हळूहळू ते मंडळ नाहींसे झाले. मध्यंतरी ‘आनन्द’ नावाची संस्था कांही उत्साही मंडळी नी चालीवली पण तीहीं नाहीशी झाली. 1924 साली प्रो. साखवळकर वगैरे प्रमुख मंडळींच्या प्रयत्नाने दासनवमी च्या दिवशी श्रद्धानन्द पार्क जवळ महाराष्ट्र मंडळ ची स्थापना झाली. त्यावेळी काहीं मंडळींनी प्रत्येकी दोन रूपये महिन्यास देण्याचे आश्वासन देऊन जागेचे भाड़े, नौकर, दिवाबत्ती वगैरे गोष्टींची व्यवस्था केली. खादाड क्लब रा. गंगाधरपंत जोग, डॉ. अभ्यंकर वगैरे मंडळीनी चालू केला. सणाच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमण्याची पद्धत सुरू झाली. गणोशोत्सवामध्ये अधिक प्रमुख्यानें मंडळी भाग घेऊ लागली व त्या उत्सवात स्थानीय जनतेला आपल्या मंडळात आपण्याचा प्रयत्न होऊ लागला. महाराष्ट्र मंडळाचे धोरण प्रथमच जातीय तेचे नाही. सर्व स्थानिक कार्यात ही मंडळी आपुलकीच्या भावनेने काम करीत त्या मुळे विरोध भाव उत्पन्न न होऊन सर्व समाजाची सहानुभूति महाराष्ट्र मंडळास मिळत राहिली.

 

श्रद्धानन्द पार्क ची जागा अपुरी पडू लागल्यामुळे स्वतःच्या मालकीची इमारत बांधून घेण्याच्या कल्पनेला चालना मिळाली व त्या कल्पनेरूप जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रथम जनरल पोस्ट ऑफीस च्या भागे एक जागा कर्ज काढून विकत घेतली गेली व त्या जागेवर इमारत बाँधण्याचा नकाशा तयार करीवला गेला पण पुढे ही जागा सुद्धा फार अपुरी पड़ेल, उसे सर्वानुमते ठरले, म्हणून दुसरी कडे जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. कानपूर डेवलेपमेन्ट बोर्ड कडे जागा देण्याबद्दल विनती-अर्ज केल्यावर बोर्ड ने महाराष्ट्र मंडळाला अर्ध्या एकरापेक्षा किंचित अधिक जमीन अत्यंत सवलतीच्या दराने दिली व ही देतानां बोर्डच्या सर्व सभासदानीं एकमताने अनूमोदन दिले. मंडळानी आपल्या सभासदांची एक महाराष्ट्र भुवन सोसायटी स्थापून ती कायद्यान्वये रजिस्टर करून घेतली व त्याकडे इमारतीची बांधणी व व्यवस्था सोपवून दिली. त्या सोसायटी ने यथाशक्ती बांधकाम पूर्ण केले.

 

बृहन्महाराष्ट्र परिषदेची कल्पना प्रथम कानपूरात निघाली. 1925 च्या राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनांचे वेळी बाहेरून आलेल्या सर्व महाराष्ट्रीय पुढाऱ्यानां पानसुपारी करिता एकत्र बोलावून त्याच्यापुढे ही कल्पना मांडून त्यांचा सल्ला व विचार घेतला. परिषदेचे सर्व श्रेय येथील महाराष्ट्र मंडळास आहे. महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत सर्व महाराष्ट्रीय संस्थांना एकत्र आणून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची रहाण्याची तात्पुरती सोय करून जनसेवा करावी असा इमारत बांधण्याचा मूळ उद्देश आहे.

 

पं. जवाहरलाल नेहरू, सर सी. वाय. चिंतामणि, मदन मोहन मालवीय, विजया लक्ष्मी पंडित, विष्णु दिगम्बर पलुस्कर पं. गोविन्द वल्लभ पंत, डॉ. खरे, काका साहेब गाडगीळ, शेषाद्रि, रँग्लर परांजपे, दादा साहेब मावळकर, प्रताप शेट, शेट वालचंद हीराचंद, डॉ. अम्बेडकर, रावबहादुर शिवराज, वीर सावरकर, तात्यासाहेब केळकर, शंकरराव देव वगैरे प्रमुख मंडळीनीं आपल्या मंडळास भेट दिली असून काहींनी उत्साहजनक शेरे ही आपल्या व्हिजिट पुस्तकांत दिलेले आहेत.

 

साभारकानपूर महाराष्ट्र मंडळाचा त्रोटक इतिहास

ले. – . वि. दामले

Quick Links

Home

About Us

History

Gallery

Contact

Contact Details

© महाराष्ट्र मंडळ, कानपुर | Copyright 2025. All Rights Reserved. Designed & Developed by Webguard info Solutions

Scroll to Top